घरोघरी शोध मोहीम   

श्रीनगर : पहलगाम  हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची व्यापक मोहीम लष्कर, पोलिस आणि निमलष्करी दलाने संयुक्तपणे अनंतनाग जिल्ह्यात हाती घेतली आहे. त्या अंतर्गते विविध ठिकाणी छापे टाकले जात असून घरोघरी तपासणी आणि चौकशी केली जात आहे संशयितांची चौकशी केली जात आहे. 
 
पहलगाम येथील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरिोधात कठोरपणे कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यत १ हजार ५०० हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता घरोघरी शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात पोलिस आणि लष्कराचे, निमलष्कराचे जवान यांचा सहभाग मोठा आहे. या माध्यमातून दहशतवाद्यांची पाळेमुळे खोदून काढली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांना आणि त्यांना पाठिंबा देणार्‍यांना जमिनीत गाडून टाकू, असा इशारा नुकताच दिला होता. 

Related Articles